सहवर्धन

सहवर्धन समूहातील सभासद एकत्र येऊन सामुदायिक सेंद्रिय, विषमूक्त भाजीपाला निर्मिती करतात. सहवर्धन सभासद स्वखर्चाने बियाणे व खते आणतात आणि स्वकष्टाने भाजीपाला वाढवतात, तर पुणे महानगरपालिका त्यांना जुने, अतिक्रमण निर्मूलन विभागाने जप्त केलेले क्रेट्स, ओल्या कचऱ्यापासून तयार झालेले खत, शेडनेट, कोकोपीट, वगैरे पुरवते. बी-बियाणे हे राणीबाई पोतेडे यांच्या सीडबँक मधून घेऊन पुरवली जातात. ओल्या कचऱ्याचा मोठ्या प्रमाणावर यशस्वी पुनर्वापर या प्रकल्पातून होत आहे.

हा प्रकल्प व्हाट्सअँप च्या सहाय्याने चलवला जतो. व त्यातील लोक व्हाट्सअँप ग्रुप च्या साहाय्याने जोडले जातात. यात ६५० ते ७०० जण सभासद आहेत, ज्यामध्ये पुण्यातून ५०० जण सहभागी आहेत तसेच रत्नागिरी, मुंबई, कोल्हापूर, सांगली या भागातून ही आहेत. या ग्रुप मध्ये सभासद अँप च्या लिंक ने जोडले जातात. डॉक्टर, इंजिनीअर, वकील, इ. क्षेत्रातील लोकही त्यात समाविष्ट आहेत.

पुणे महानगरपालिका आणि सहवर्धन यांनी सहकार्याने घोले रोड क्षेत्रिय कार्यालय आणि औंध क्षेत्रिय कार्यालय या इमारतींच्या टेरेस वर अशी पथदर्शी स्वावलंबन उद्याने यशस्वीपणे उभारली आहेत, आणि ही पाहण्यासाठी पुण्यातील आणि इतर अनेक शहरांमधून पाहुणे भेट देण्यासाठी येतात. सहवर्धन समूहाने शाळा, कॉलेज व खाजगी इमारतींमध्येही अशी उद्याने उभारण्यात पुढाकार घेतला आहे. या प्रयत्नांद्वारे नागरिक विषमूक्त भाजीपाल्याची शेती स्वत: करीत आहेत.

आयुक्त, उपायुक्त आणि सह-आयुक्तांच्या समन्वयाने सहवर्धन समूहाला पुणे परिसरातील शक्य त्या सर्व शासकीय इमारतींवरील टेरेसवर अशी उद्यानं उभारली जावीत असा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पात सर्व महानगरपालिका विभागांचा सक्रिय सहभाग असेल याची विभागप्रमुखांनी खात्री करावी असे आयुक्तांनी आदेश दिले आहेत.

सहवर्धन समुहाचा घोले रोड क्षेत्रीय कार्यालय टेरेसवर पहिला नैसर्गिकपणे भाजीपाला पिकवणेचा टेरेस गार्डन प्रकल्प उभारण्यात आलेला आहे. या टेरेस गार्डन वरून अनेकांनी प्रेरणा घेतली, त्याच दरम्यान मा. पंतप्रधानांनी ‘मन की बात’ मधे नैसर्गिकपणे भाजीपाला पिकवणे बाबत चे महत्व हे शालेय वयातच विद्यार्थ्यांना अवगत करणेची गरज व त्या साठी शाळांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता नमूद केली होती. हाच धागा पकडून अभिनव शैक्षणिक संस्थांचे संस्थापक मा.राजीव जगताप यांनी आपल्या ग्रुपशी संपर्क साधून त्यांच्या आंबेगाव व नर्हे येथील शैक्षणिक संस्थांचे इमारतीवरील ७०००+sf जागेवर प्रकल्प राबविण्यासाठी आमंत्रित केले.

आपल्या ग्रुपच्या डाॅ. राम दातार, अनिल झोडगे व समीर पवार यांनी तात्काळ प्रतिसाद देत योजनेचा परिपूर्ण आराखडा तयार केला, अभिनव संस्थेनेही तात्काळ प्रतिसाद देत त्यांची टीम व सहवर्धन ची टीम एकत्रित आली व हा प्रकल्प उभा राहिला.

सर्व प्राथमिक तयारी पुर्ण करून 26 डिसेंबर 2019 रोजी वांगी, कोबी, फ्लॉवर, भेंडी, टोमॅटो, ढोबळी मिरची, मिरची, शेपू, पालक, मेथी, कोथिंबीर इ. लागवड केली गेली. आज या प्रकल्पातून पहिले पीक मेथीची भाजी काढण्यात आली.

विशेषतः या प्रकल्पात सुरूवातीपासून वाफे तयार करणे, खत + माती मिश्रण तयार करणे, पाचव्या मजल्यावर टेरेसवर सर्व सामान वाहून नेणे,वाफे खत + माती मिश्रणाने भरून घेणे, रोपे, बिया लावणे, रोज पाणी घालणे या सर्व कामांमधे सहवर्धन टीम सोबत अभिनव शैक्षणिक संस्थेमधील स्टाफ, शिक्षक, व विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग होता व आहे.

सहवर्धन समुहामधील, उषा कुलकर्णी, सुनिता चिटणीस, स्मिता होनप, संगिता कुलकर्णी, अंजली माहुली, अर्चना देवधर, सविता सपकाळ, मिलींद जाधव, सविता जयस्वाल, रमा जोशी, निर्मला थोरमोटे, शैलजा कामत, वृषाली ठाकूर, सुनिता बोकन या सदस्यांनी सुरूवातीपासून या प्रकल्पात सहभाग नोंदवला आहे. दिव्याने दिवा लागावा तद्वत सहवर्धन समुहाची वाटचाल चालू आहे.

ही अभिनव संस्थेच्या आंबेगाव कॅम्पस टेरेस वरील पहिल्या टप्प्यातील प्रगती आहे, आणखी महिनाभरात उर्वरित अर्ध्या भागात सात प्रकारच्या मॉडेल गार्डन्स ची निर्मिती केली जाईल. मार्च महिन्यात नऱ्हे कॅम्पस चार टेरेस आणि इमारतीच्या आजूबाजूच्या जमिनीवर भाजी उद्यान आणि कंपोस्टिंग पिट प्रकल्प हाती घेतले जातील.